पुणे । बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 23 दिवस होत आहेत. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्र्यांनी सीआयडी कडे सोपविले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे.
वाल्मिक कराड शरण येणार याची बातमी सकाळी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्यानंतर वाल्मक कराड याच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात सीआयडी कार्यलयाबाहेर गर्दी केली होती. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे. बीड आणि अहमदनगरवरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी जमली होती.
मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
Discussion about this post