पुणे । मुळशी तालुक्यात वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून होती. दरम्यान सासऱ्यांनी तिचा हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केला आहे. यामुळे या घटनेने सध्या राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान वैष्णवीच्या लग्नात तिच्या आई-वडिलांनी हुंड्यात नक्की किती गोष्टी दिल्या आहेत ते समोर आलं आहे. वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांकडून अनेक गोष्टी मागण्यात आल्या होत्या. वैष्णवीच्या वडिलांनी कोट्यवधी रुपयांच्या वस्तू हुंड्यात दिला होता.
वैष्णवीच्या वडिलांनी लग्न 51 तोळं सोनं आणि फॉर्च्यूनर कार दिली होती. लग्नानंतर चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं. तिचं लग्न हे फारचं थाटामाटात करण्यात आलं होतं. तरी देखील तिचा जाच केला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.
पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. 16 मे 2025 रोजी वैष्णवीने गळफास घेतल्याचे शशांकने सांगितले. चेलाराम हॉस्पिटलमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि गळ्यावर लालसर व्रण आढळले. शशांक आणि राजेंद्र यांनी “पैसे न दिल्याने वैष्णवीला मारले” असे सांगितल्याचा दावा वैष्णवीचे वडील कस्पटे यांनी केला आहे.
Discussion about this post