जळगाव । राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान, पाचोरा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या गाडीवर काही लोकांनी दगडफेक केलीय. या दगडफेकीत त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटननेनंतर प्रतिक्रिया देताना वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या, बाहेरचे गुंड पाचोऱ्यात आले आहेत. अशा लोकांना आणून निवडणूक अधिकाऱ्यांनी याची चौकशी झाली पाहिजे वैशाली सूर्यवंशी यांची मागणी केलीय.
या दगडफेक प्रकरणावर माहिती देताना, वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या, आमची निर्मल सीड्सची गाडी शेतातून येत होती. त्यावेळी आमच्या गाडीवर दगडफेक झाली. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास स्वामी लॉन्स येथे काही गुंडांनी गाडीची तोडफोड केलीय. हे गुंड बिहार, मध्यप्रदेशमधील असून त्याच्या मदतीने या काळात कोणता उद्योग उभारत आहेत. कुठल्या ना कुठल्या गोष्टी करून आमदारांनी बोगस मतांसाठी धडपड चालवली असल्याचा आरोप वैशाली सूर्यवंशी यांनी केलाय.
याची चौकशी झाली पाहिजे. हे गुंड आमदाराचे होते. निर्मल सीड्सची गाडी एका शेतात गेली होती. दुपारी ही गाडी परतत असताना स्वामी लॉन्सजवळ गुंडांनी गाडीवर दगडफेक केली. हे गुंड मतदारसंघात दहशत निर्माण करण्यासाठी आणले आहेत का? तसेच आयटीचे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत का? असा सवाल सूर्यवंशी यांनी केलाय.
Discussion about this post