छत्रपती संभाजीनगर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. असून मात्र याच दरम्यान बारावीच्या पेपरसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. यात पाच विद्यार्थी जखमी झाले आहे आहेत. ही घटनाछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
सकाळी ११ वाजता पहिल्या पेपरला सुरुवात झाली. तर याच पेपरसाठी तालुक्यातील खंडाळा येथून विद्यार्थी हे कारद्वारे लाख खंडाळा येथील परीक्षा केंद्रावर येत असताना सकाळी १० वाजेच्या सुमारास खंडाळा शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन गाडी पलटी झाली. या अपघातात विद्यार्थी जखमी झाले. ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य करत गाडीतून बाहेर काढले. अपघातानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती शिक्षकांकडून प्राप्त झाली आहे.
Discussion about this post