चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ दि. 4 रोजी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. ट्रक आणि आयशर गाडीची समोरासमोर धडक झाल्याने यात आयशर चालक जागीच ठार झाला आहे. तर ट्रक मधील चार गंभीर जखमी झाले असल्याचे समजले आहे .
जेसीबीच्या माध्यमातून जखमींना अपघातग्रस्त वाहनातून काढण्यात आले. याप्रसंगी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. समाधान मेघराज पाटील (सार्वे ह.मु.तांबोळा खुर्द) असे मयत चालकाचे नाव आहे.
काय घडले नेमके
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक क्रमांक (एम.एच.19 झेड.4758) व आयशर (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.0704) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आयशर चालक समाधान पाटील याचा जागेवर मृत्यू झाला तर ट्रक चालकासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरील बाजूचा चुराडा झाला तर जखमींना जेसीबी आणि क्रेनच्या मध्यमातून बाहेर काढण्यात आले.
जखमी झालेल्यांना चाळीसगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीक आणि पोलीसांनी धाव घेवून बचाव कार्य सुरू केले. या भीषण अपघातामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Discussion about this post