जळगाव । राज्यात पुन्हा पावसाचे संकट आहे. पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह तुरळक आणि किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजनुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, या भागात शनिवारी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आजही या भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज आहे. नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पाचे ढग तयार झाल्यामुळे हवामानावर परिणाम दिसून येत आहे.
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 7 जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यत आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.















Discussion about this post