मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत मोठी घडामोड समोर आली आहे. इस्रायल अमेरिकाचे इराणसोबत असणार युद्ध कधी संपणार? याबाबतची तारीख अमेरिकेनं जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करत ९ एप्रिल २०२६ ही युद्ध संपवण्यासाठी लक्ष्य तारीख निश्चित केल्याचे संकेत दिले आहेत. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर शांततेच्या आशा पुन्हा निर्माण झाल्या आहेत.
ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने इराणमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर कारवाई केली असून जे नुकसान करता येईल ते करण्यात आले आहे. आता संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक मार्ग स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतल्याने युद्धविरामाच्या दिशेने सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
१५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमतीचा दावा
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत सुमारे १५ मुद्द्यांवर सहमती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. सुरुवातीला चर्चा नाकारलेल्या इराणने नंतर वाटाघाटींना मान्यता दिल्याने सर्वसमावेशक कराराची शक्यता वाढली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.युद्धविरामाचा करार झाला तर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संपूर्ण जगाचे लक्ष आता ९ एप्रिल या तारखेवर केंद्रित झाले आहे.















Discussion about this post