मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातच बंड करून भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.
अजित पवार यांना सरकारमध्ये सामील करून भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्याय शोधत आहे, अशीही चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी तातडीने आपल्य गटातील आमदार तसेच मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील बाळासाहेब भवनात दुपारी ४ वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.
दरम्यान, या बैठकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री तसेच आमदार खासदारांसह सर्व पदाधिकारी दुपारी २ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर शिंदे गटात मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shivsena) बंड केल्यानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकारमध्ये राहायचं नव्हतं, बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही, असं म्हणत शिंदे गटातील आमदारांनी आतापर्यंत हिंदुत्वाचा दाखला दिला.