केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC चा प्रीलिम्स 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC CSE प्रीलिम्स परीक्षा देतात. आयोगाने 28 मे 2023 रोजी यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा 2023 चे आयोजन केले होते. त्याचा आज निकाल लागला आहे.
या परीक्षेत 14, 624 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देण्यास पात्र झाले आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. तरच या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येते. मुख्य परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या अर्जाची नियमावली आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
UPSC प्रीलिम्स 2023 परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार UPSC upsc.gov.in आणि upsconline.nic या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. तसेच, खाली दिलेल्या या चरणांचे अनुसरण करून, तुम्ही निकाल पाहू शकता
कसा तपासायचा निकाल
UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
मुख्यपृष्ठावर, ‘लिखित निकाल – नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2023’ या दुव्यावर क्लिक करा.
तुमच्या स्क्रीनवर एक PDF फाइल दिसेल.
या पीडीएफ फाइलमध्ये पात्र उमेदवारांचे रोल नंबर नमूद केले जातील.
या यादीत तुमचा रोल नंबर शोधा आणि भविष्यातील संदर्भांसाठी PDF फाइल सेव्ह करा.