नवी दिल्ली । केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीकडून सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा १५ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. दरम्यान, युपीएसीसीच्या साईटवर जाऊन उमेदवारांना निकाल पाहता येणार आहे.
युपीएससीनं २८ उमेदवारांचा निकाल कोर्टानं प्रलंबित प्रकरणाणुळे राखून ठेवला होता. मात्र, काल निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे अंतिम निकाल १५ दिवसांच्या आत वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहे. आयोगाने जाहीर केलेले निकाल ३० दिवस वेबसाईटवर उपलब्ध राहतील.
निकाल कसा पाहणार?
1. युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जा
२ . होमपेजवरील रिझल्ट या लिंक वर जाऊन क्लिक करा.
३. पीडीएफच्या स्वरुपात एक नवीन पेज उघडलं जाईल.
४. पीडीएफ डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट घ्या. या पीडीएफमध्ये ज्या उमेदवारांचे नंबर असतील, ते IAS, IFS, IPS आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि गट ब) यांची वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र झालेले असतील.
मुलाखतीचे फॉर्म कुठे भरणार?
वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवारांना डिटेल फॉर्म -२ (DAF-II) अनिवार्य भरावा लागणार आहे. त्यानंतर जमा करावा लागणार आहे. पुढे ९ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
या उमेदवारांची मुलाखतीची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. याचबरोबर ही मुलाखत लोकसेवा आयोगाचं कार्यालय, धोलपूर हाऊस, शहाजहाँ रोड, नवी दिल्ली – ११००६९ इथं पार पडतील.















Discussion about this post