नवी दिल्ली । केंद्रीय लोकसेवा आयोगाचे चेअरमन डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोनी यांच्या कार्यकाळाला अद्याप ५ वर्ष शिल्लक असताना त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे दिला असून अद्याप तो स्विकारला नसल्याची माहिती आहे. डॉक्टर सोनी हे २०१७ मध्ये लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले होते तर २०२३ मध्ये त्यांनी युपीएससी बोर्डाचे अध्यक्षपद स्विकारले होते. अशातच त्यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, देशभरात सध्या पूजा खेडकर प्रकरण गाजत आहे. पूजा खेडकर यांच्या वादग्रस्त प्रकरणामुळे लोकसेवा आयोगातील परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच अध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आलं आहे.यावरही सोनी यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी या पदावरून पायउतार होत आहे. प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) वरील वाद आणि आरोपांशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post