तुम्हीही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.
ही भरती प्रक्रिया केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. तब्बल 1930 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. चला तर मग इच्छुकांनी फटाफट अर्ज ही करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देखील देण्यात आलीये.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
ही भरती प्रक्रिया नर्सिंग ऑफिसर या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 30 असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये काही सूट ही देण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे B.Sc नर्सिंग किंवा GNM ची पदवी असणे आवश्यक आहे. फक्त हेच नाही तर पदवीसोबतच उमेदवाराकडे किमान एक वर्षांच्या तरी कामाचा अनुभव असणेही आवश्यक आहे. कामाचे ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही असू शकते. B.Sc नर्सिंग आणि GNM झालेल्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.















Discussion about this post