Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्डचा डेटा वेबसाइटवर अपलोड ; भाजपवर देणग्यांचा पाऊस, पहा किती मिळाली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 15, 2024
in राष्ट्रीय
0
निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्डचा डेटा वेबसाइटवर अपलोड ; भाजपवर देणग्यांचा पाऊस, पहा किती मिळाली
बातमी शेअर करा..!

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉन्डचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केलाय. निवडणूक आयोगाकडून दोन डेटा अपलोड करण्यात आले आहेत. एसबीआयकडून घेण्यात आलेल्या बॉन्ड्सची माहिती वेबासाइट अपलोड करण्यात आलीय.हा डेटा ७६३ पानांचा आहे. दरम्यान पाच वर्षांमध्ये या बॉण्डच्या माध्यमातून भाजपला सर्वाधिक 6 हजार 566 कोटी इतका पैसा मिळाला आहे. विशेष यात ईडी, आयकर चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या 30 कंपन्यांकडून तब्बल 335 कोटी रुपये भाजपच्या गल्ल्यात जमा झाल्याचे निवडणूक आयोगाच्या तपशिलातून स्पष्ट झाले आहे.

इलेक्टोरल बाँड म्हणजेच निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉन्डचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केला. रोखे खरेदीदार आणि लाभार्थी राजकीय पक्ष यांच्या नावांच्या याद्या दोन स्वतंत्र भागात पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात आल्या आहेत. या तपशिलातून, कोणत्या कंपनीकडून कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली हे स्पष्ट होत नसले तरी, अनेक माध्यमांनी या तपशिलाच्या आधारे खरेदीदार कंपन्यांची कुंडली मांडून मोठे उद्योगसमूह आणि सत्ताधारी भाजपचे लागेबंधे उघड केले आहेत.

आयोगाने शेअर केलेल्या तपशिलानुसार ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनीअरिंग, पिरामल एंटरप्रायझेस, टोरेंट पॉवर, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स, वेदांत लि., अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल, एडलवाइज, पीव्हीआर, केव्हेंटर, सुला वाईन, वेलस्पन आणि सन फार्मा, वेदांता अशा अनेक कंपन्यांची नावे खरेदीदारांच्या यादीत आहेत.

तर रोखे वटवणाऱया पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस, अण्णा द्रमुक, भारत राष्ट्र समिती, तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पक्षासह बहुतेक सर्व पक्ष आहेत. यात सर्वाधिक रक्कम भाजपच्या खात्यात गेली असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या खात्यात सुमारे 8 हजार 633 एंट्री झाल्या आहेत तर काँग्रेसच्या खात्यात 3 हजार 145 एंट्री दिसत आहेत.

सर्वाधिक रोखे खरेदीदार कंपन्या
फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस – रु. 1,368 कोटी
मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड – रु. 966 कोटी
क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड – 410 कोटी रुपये
वेदांता लिमिटेड – 400 कोटी रुपये
हल्दिया एनर्जी लिमिटेड – रु. 377 कोटी
भारती समूह – 247 कोटी रुपये
एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड – रु. 224 कोटी
वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन – 220 कोटी रुपये
केव्हेंटर फूडपार्क इन्फ्रा लिमिटेड – 194 कोटी रुपये
मदनलाल लिमिटेड – रु. 185 कोटी
डीएलएफ समूह – रु. 170 कोटी
यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल – 162 कोटी रुपये
उत्कल अल्युमिना इंटरनॅशनल – 145.3 कोटी रुपये
जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड – रु. 123 कोटी
बिर्ला कार्बन इंडिया – रु. 105 कोटी
रुंगटा सन्स – 100 कोटी रुपये
डॉ रेड्डीज – 80 कोटी रुपये
पिरामल एंटरप्रायझेस ग्रुप – 60 कोटी रुपये
नवयुग अभियांत्रिकी – 55 कोटी रुपये
शिर्डी साई इलेक्ट्रिकल्स – 40 कोटी रुपये
एडलवाईस समूह – 40 कोटी रुपये
सिप्ला लिमिटेड – रु. 39.2 कोटी
लक्ष्मी निवास मित्तल – 35 कोटी रुपये
ग्रासिम इंडस्ट्रीज – 33 कोटी रुपये
जिंदाल स्टेनलेस – 30 कोटी रुपये
बजाज ऑटो – 25 कोटी रुपये
सन फार्मा प्रयोगशाळा – 25 कोटी रुपये
मॅनकाइंड फार्मा – 24 कोटी रुपये
बजाज फायनान्स – 20 कोटी रुपये
मारुती सुझुकी इंडिया – 20 कोटी रुपये
अल्ट्राटेक – 15 कोटी रुपये.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वनरक्षकास शिवीगाळ व शासकिय कामात अडथळा आणणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

रावेरातून नाथाभाऊंकडून रोहिणी खडसेंच्या उमेदवारीस स्पष्ट नकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

रावेरातून नाथाभाऊंकडून रोहिणी खडसेंच्या उमेदवारीस स्पष्ट नकार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page