राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आली असून या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
काही जिल्हा परिषदांनी पवित्र संकेतस्थळावर पदभरतीची जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार आत्तापर्यंत १२ हजार पदांची जाहिरात देण्यात आली आहे. यामुळे बंपर पोलीस भरतीनंतर आता राज्यात बंपर शिक्षक भरती होणार आहे. शिक्षक भरतीचे खरे चित्र १५ जानेवारीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचा 30 हजार पदांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे
30 हजार पदे म्हणजे रिक्त पदांपैकी केवळ 70 टक्के पदे आहेत. राज्यातील खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची सुमारे 20 हजार पदे रिक्त आहेत. रिक्त पदांसाठी तयार करण्यात आलेल्या रोष्टरबाबत काही आक्षेप आहेत. त्यामुळे 10 टक्के जागा न भरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या केवळ रिक्तपदांपैकी 70 टक्के पदांची जाहिरात काढली जाणार आहे. या जागाही 30 हजारांच्या जवळपास आहे. यामुळे दीर्घ कालावधीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती सुरु करण्यात आली आहे.















Discussion about this post