जळगाव । मुलांच्या बालसुधारगृहातील एका १३ वर्षीय मुलाने तेथील १० वर्षीय बालकाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. हा धक्कादायक प्रकार बालसुधारगृहातच घडला. बालसुधारगृहातील एका १३ वर्षीय मुलाने पीडित मुलाला ११ सप्टेंबरला रात्री अडीचला झोपेतून उठवून वरच्या मजल्यावर नेले. तेथे स्नानगृहासमोरील मोकळ्या जागेत त्याला लाथ मारून खाली पाडले व त्याच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले.
या प्रकरणी बालसुधारगृहाचे अधीक्षक रविकिरण अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Discussion about this post