जामनेर । एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबत नसून अशातच जामनेर तालुक्यातील हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गीक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच गावात राहणारा गोविंदा शांताराम वाघ याने पिडीत मुलाला दुचाकीवर बसवून शेतातील शिवारात नेत त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलाने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला.
याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली. त्यानुसार बुधवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पहूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोविंदा वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहे.
Discussion about this post