जळगाव । ऐन निवडणूक काळात जळगावचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. उन्मेश पाटील यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाआधी जळगावात घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटात पक्षप्रवेशापूर्वीच जळगावात करण पवार यांचं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं पोस्टर व्हायरल झालं आहे.
उन्मेश पाटील आज आज मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्यासह करण पवार यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेश पाटील जरी ठाकरे गटात प्रवेश करणार असले तरी निवडणुकीची उमेदवारी मात्र करण पवार यांना मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे करण पवार हेच जळगाव लोकसभा जिंकतील, असे पोस्टर जळगावमध्ये व्हायरल झाले आहेत.
‘ते’ पोस्टर व्हायरल
करण पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झालं असल्याची माहिती आहे. कालपासूनच त्यांच्या नावाचे प्रचाराचे बॅनर व्हायरल झाले आहेत. पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह उन्मेश पाटील यांचाही फोटो झळकला आहे. वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर करण पवार यांच्यासह उन्मेश पाटील यांचं ठाकरे गटाच्या वतीने स्वागत केलं जात आहे.
Discussion about this post