जळगाव : जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. तेव्हापासून उन्मेष पाटील आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमध्ये शाब्दिक वार सुरु आहे. यातच उन्मेष पाटील यांनी मंत्री महाजन यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप डोक्याचं राजकारण करत आहे. पण डोक्यात काय आहे? त्याचा विचार करा… कागदावर गणितं सोडवत आहात. मात्र हिशोब करत नाहीत .तुमच्याकडे अजित दादा पवार आले आहेत. एकनाथ शिंदे आले आहेत. अशोक चव्हाण आले आहेत. राज ठाकरे म्हणजेच मनसे आली आहे. पण ते कोणीही दिलसे. म्हणजेच मनापासून आलेले नाहीत… तुमच्याकडे डोकी आली आहेत. पण डोक्यातले विचार नाही आले. लीडर आले पण केडर नाही आले…. त्यामुळे गर्दी पेक्षा गर्दी लोक तुमच्या सोबत आहेत का? गर्दी पेक्षा त्या लोकांचं मन तुमच्यासोबत आहे का?, बे बघितलं पाहिजे, असं म्हणत उन्मेश पाटील यांनी निशाणा साधला आहे.
गिरीश महाजनांवर निशाणा
गिरीश महाजन स्वतः ला संकट मोचक समजत असतील. तर 22 वर्षापासून विधानसभेत काय केलं? त्या ठिकाणी मुका माणूस जरी बसवलं असता, तो बोलायला लागला असता.. मात्र हे शेतकऱ्यांच्या समस्यांवर, सर्वसामान्यांच्या समस्यावर हे काहीच बोलत नाहीत? असा सवाल उन्मेश पाटील यांनी केला आहे