जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून सोमवार दि. २५ नोव्हेंबर पासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
ही परीक्षा अंदाजे जानेवारी २०२५ च्या पहील्या आठवड्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. २५ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. दि. ९ डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतीम तारीख आहे. परीक्षेतून सुट प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दि.१६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुळ प्रत विद्यापीठात देणे बंधनकारक आहे. दि. २० डिसेंबरला परीक्षेतून सुट प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर केली जाईल. दि. २२ डिसेंबर पर्यंत त्यावर आक्षेप घेता येतील.
परीक्षेतून सुट मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी दि. २५ डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. त्याच दिवशी पेट परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडी मध्ये प्राप्त होतील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेऊन दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल. पेट परीक्षा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन अर्जाची मुळ प्रत दि. ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. पेट परीक्ष २०२१ व २०२३ ची उत्तीर्ण झालेल्या व सुट प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना देखील पेट २०२४ च्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अशी माहित विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Discussion about this post