जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील संगणकशास्त्र प्रशाळेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी एम.सी.ए. प्रथमवर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी रिक्त जागांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ०५ सप्टेंबर ते दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष हस्तलिखीत अर्ज मागविले आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष प्रवेश देण्यात येईल.
संगणकशास्त्र प्रशाळेत रिक्त जागांची माहिती व प्रवेश वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना/पालकांना आवाहन करण्यात येते की अधिक माहितीसाठी या प्रशाळेतील प्रा. अजय पाटील (मोबाईल क्र. ९४२३९७५२१५) व प्रा. संदीप भामरे (मोबाईल क्र. ९८५००९७३१८) यांचेशी संपर्क साधावा. असे संचालक प्रा. राकेश रामटेके यांनी कळविले आहे.















Discussion about this post