बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.
बँकेने अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आली आहे. याबाबत बँकेने अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे. अप्रेंटिस पदासाठी एकूण ५०० जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला लिंक दिसेल त्यावर क्लिक करुन फॉर्म भरायचा आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष असावे.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
निवड कशी केली जाणार?
या नोकरीसाठी उमेदवाराची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना १०० गुणांची एक परीक्षा घेण्यात येईल. या परिक्षेत पास झाल्यानंतर उमेदवारांनी मेडिकल परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर मेरिटच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम उमेदवाराला यूनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच unionbankofindia.co.in या वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर होमपेजवर रिक्रूटमेंट सेक्शनवर क्लिक करा.
यानंतर उमेदवारांनी आपली माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
यानंतर अर्ज शुल्क जमा करुन फॉर्म सबमिट करावा लागेल.
यानंतर या फॉर्मची प्रिंट काढून ठेवा.















Discussion about this post