पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी चालून आलीय. युनियन बँक ऑफ इंडियातर्फे लोकल बँक ऑफिसरच्या १५०० रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीच्या प्रक्रियेला २३ ऑक्टोबर २०२४ पासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना अर्ज नोव्हेंबरच्या १३ तारखेपर्यंत करता येणार आहे.
अशी आहे शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.
इतकी परीक्षा फी लागेल?
या परिक्षेसाठी सामान्य, EWS, OBC गटातील उमेदवारांना 850 रुपये अर्ज फी तर SC, ST, PWBD गटातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे.
इतका मिळणार पगार
या भरतीप्रक्रीयेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमाह 48480 ते 85920 इतके वेतन दिले जाईल.