जळगाव । जळगावातील शनीपेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई केलीय. यात गोपनीय माहितीच्या आधारे मामा-भाच्याकडून तलवारीसह गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त केले. शाम साहेबराव सपकाळे (30, रा.असोदा रोड) व त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू धनराज सोनवणे (20, रा.असोदा रोड) अशी अटकेतील आरोपींची नावे असून दोघांविरोधात शनीनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयीत पिस्टल व तलवार बाळगून असल्याची माहिती शनीपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना कळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. गुन्हे शोध पथकातील अंमलदार हवालदार गिरीश पाटील, अनिल कांबळे, विकी इंगळे, गजानन वाघ, पराग दुसाने, शाम काळे यांनी बुधवार.
1 जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील संशयित शाम साहेबराव सपकाळे यास पिस्टल बाळगून दशहत निर्माण करताना पकडले तसेच दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले शिवाय आरोपीचा भाचा विशाल उर्फ सोनू सोनवणे याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. दोघांविरोधात शनीनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.
Discussion about this post