एरंडोल । तालुक्यातील उमरदे गावाजवळ विचित्र अपघातात झाला. भरधाव वेगाने जाणारे चार वाहने एकमेकांवर धडकले. यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर रिक्षा चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले. रामकृष्ण भागवत पाटील (वय ३०) रा. ठाकरेनगर, पुनगावरोड पाचोरा असं अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या अपघातातील जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत असे की, रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या एरंडोल कडून नेरीकडे जाणारा ट्रक क्रमांक आर.जे.१० जी बी ८५२८, म्हसावद कडून एरंडोलकडे येणारी आर्टिगा क्रमांक एम.एच.१८ बीसी १४०८, रिक्षा क्रमांक एमएच १९ व्ही १२६७ आणि मोटारसायकल क्रमांक एमएच १९ डीक्यू ८१४७ अशा चार वाहनांचा उमरदे जवळ अपघात झाला. अपघातात मोटारसायकलचालक रामकृष्ण भागवत पाटील (वय ३०) रा. ठाकरेनगर, पुनगावरोड पाचोरा हा युवक जागीच ठार झाला तर रिक्षासह अन्य वाहनातील विनोद शांताराम मालुबाई सोनवणे, रा.उमरदे, विक्रम पाटील रा. भातखेडे, नवल दोधू मोरे रा.उमरदे, बेबाबाई बाळू पाटील रा. भातखेडे, विक्रम विठ्ठल पाटील रा. भातखेडा असे पाच जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर मोठा आवाज झाल्यामुळे शेतातील मजूर व ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळतत्व पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातस्थळी जाऊन मृत व जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल केले. अपघातानंतर रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पाटील, डॉ. मुकेश डॉ. कैलास चौधरी व कर्मचा-यांनी तातडीने उपचार सुरु केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती
Discussion about this post