जळगाव । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरे करत आहेत. जनतेशी संवादाबरोबरच शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत आहेत. याचदरम्यान, उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर असून शहरात जाहीर सभा होत आहे. यापूर्वी त्यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली
सरदार पटेलांनी त्याकाळात आरएसएसवर बंदी देखील आणली होती. म्हणजे त्यांना देशप्रेम काय हे कळत होते, पुतळ्याची उंची ठीक आहे. कामाची उंची कधी गाठणार असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावा आहे. मला माझ्या महापौर आणि उपमहापोरांसह इतर सहकाऱ्याचा अभिमान आहे. पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे, नाव लावून कुणी काही करु शकेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, काम करुन जनतेने एखादी उपाधी जनतेने द्यायची अशी तुरळक व्यक्तीपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जळगाव मनपाचे आभारही मानले आहे.
Discussion about this post