जळगाव । शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर त्यांची जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारसह पंतप्रधान मोदींवरही घणाघात केला. “स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान नसलेली लोक फक्त नेते चोरुन मिरवण्याचे काम सध्या करत आहेत.
तिकडे वल्लभभाई, सुभाष बाबू आणि आता माझे वडील चोरायला निघालेत,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. “वल्लभभाई पटेलांचा हजारो कोटींचा पुतळा बांधला पण त्यांच्या कामगिरीच्या जवळही ते फिरकू शकत नाहीत,” असेही ते यावेळी म्हणाले.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका केली. ” कधीकाळी युतीचे वैभवशाली दिवस होते. नाथाभाऊ, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसारखे नेते एकत्र दिसायचे, मात्र सध्या भाजपमध्ये सगळे उपरे आहेत फडणवीसांनी निष्ठावान नेते संपवले आणि उपरे उरावर बसवले,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, जालन्यातील आंदोलन कर्त्यांवर झालेल्या लाठीचारावरुन उद्धव ठाकरेंवर राज्य सरकारवर टीका केली. “शांततेनं उपोषण करत होते. असे काय चुकले की त्यांना दणादण मारत सुटले, जालियानबाला हत्याकांड झाले तसेच हे जालना कांड… असा घणाघात त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे, मात्र जरांगे पाटील उपोषणाला बसलेत त्यांच्याकडे जायला वेळ नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लगावला.
Discussion about this post