मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सौगत-ए-मोदी’ उपक्रमावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपने ‘बंटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला होता. आता तेच ‘सौगत-ए-मोदी’ असलेल्या किट्सचे वाटप करत आहेत. हे कोणत्या प्रकारचे किट आहे? राजकीय स्वार्थ साधण्याचा हा किट आहे. या उपक्रमातून भाजपची दुटप्पी भुमिका समोर आलीय असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.
यामुळे भाजपचा हा उपक्रम सौगात-ए-मोदी नाही तर सौगात-ए- सत्ता असल्याचं आरोपही ठाकरेंनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने राज्यात ‘बंटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला होता. पण आता तेच लोक सौगत-ए- मोदी कीट्सचे वाटप करत आहेत. त्यावरून भाजपचा दुटप्पी चेहरा समोर येत आहे. भाजपचा हा उपक्रम गरीब लोकांना मदत करण्याचा नाही, तर राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.
येत्या काही दिवसात बिहार राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमध्ये सत्ता मिळावे यासाठी भाजपने हा उपक्रम सुरू केलाय. मी हिंदुत्त्व सोडून दिल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. पण आता ते काय करत आहेत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. कुणाल कामराबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांचा अपमान केल्यामुळे सरकार कुणाल कामाराला समन्स देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरांविरोधात काहीच कारवाई केली नाहीये.
Discussion about this post