मुंबई । राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ नेते मंडळींच्या प्रचार सभांना वेग आला असून यातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांच्या ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यावर भाष्य केलं आहे. तसेच महाविकास आघाडीतील फुटीबाबतही त्यांनी भाष्य केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेस आणि आमचं विसर्जन झालं नाही. काँग्रेस त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. मी माझा. आम्ही एकमेकांबद्दल विरोधात बोलत नाही. काँग्रेसने का निर्णय घेतला हे मला अजून कळलं नाही. राज ठाकरेंबद्दल ते बोलले नाही. राज ठाकरे आणि आम्ही एकत्र येणं हा आमचा निर्णय आहे. मविआचा बळी गेला असं मानू थोडावेळ. महायुतीत अजित पवार त्यांच्यावर बोलतात. गणेश नाईक बोलतात. भाजपच्या लोकांनी पन्नास खोकेच्या घोषणा दिल्या. हे एकमेकांच्या उरावर बसले. आम्ही तर तसं केलं नाही ना. ते सत्तेत असूनही एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत.
“किसिंग नको आता चक्की पिसिंग करावं”
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, यालाच म्हणतात पारदर्शक कारभार. सभ्य भाषेत बोलायचं तर नंगानाच. निर्लज्जपणे एकमेकांचे कपडे फाडत आहेत. ७० हजार कोटींचा आरोप खोटा असेल तर अजित पवारांची माफी मागावी. खरा असेल तर किसिंग नको आता चक्की पिसिंग करावं. त्यांनी सांगितलं असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.















Discussion about this post