मुंबई : कधीकाळी एकत्र सत्तेत असलेले शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना- भाजप युती का तुटली? याबाबत खुलासा केला. तसेच देवेंद्र फडणवीसांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी माझ्या वडिलांना (बाळासाहेब ठाकरे) वचन दिले होते की राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. त्याप्रमाणे सेना आणि भाजपकडे 2.5 वर्षे मुख्यमंत्रीपद असेल असे अमित शहा यांच्याशी चर्चेमध्ये ठरले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मी माझ्या मुलाला आदित्यला मुख्यमंत्री बनवू आणि ते स्वतः दिल्लीला जातील,” असा मोठा दावा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.