मुंबई । आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन लाभ जाहीर करण्यात आला आहे. तसेच इतर काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी त्यांनी केल्या. दरम्यान, या अर्थसंकल्पावर शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आणि सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आम्ही केली होती, आणि त्यानंतर कोरोना संकट आले. जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना आम्ही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. आता सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय योजना नाहीत, तर ठेकेदारांसाठी ठोस योजनांचा तपशील दिला आहे. हा अर्थसंकल्प विकासाचं मृगजळ दाखवणारा आहे. प्रत्येकाला काही दिवसांनीच समजेल की त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात काय फरक पडणार आहे.”
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले, “राज्याची आर्थिक परिस्थिती सर्वांना ठाऊक आहे. फक्त कर्ज घेऊन आणि फटाके वाजवून तयार केलेला हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी फारसा उपयुक्त ठरणार नाही. जर खरोखर शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल, तर त्यांनी कालबद्ध पद्धतीने केलेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या मार्गावर चालावे.”















Discussion about this post