मुंबई । राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मात्र अशातच महायुतीमधील घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. त्यात शिंदे सेना आणि भाजपमधील पक्ष प्रवेशा वादाचे ठरले असून यामुळे महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. थेट युती तुटण्यापर्यंतची भाषा करण्यात येत आहे यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर निशाणा साधत महायुतीतील घटक पक्षांना सावधगिरीची इशारा दिला.
मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील पक्ष चालवतात या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. हे तीनही पक्ष एकच असल्याचे ते म्हणाले. या पक्षांची नावं आणि निशाण्या वेगळ्या जरी असल्या तरी इतर दोन पक्षं हे भाजपच्या बी टीम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. त्यांचा मालिक एक आहे, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला. महायुतीमध्ये प्रवेशावरून नाराजी नाट्य सुरु असल्याबाबत ठाकरे यांनी सूचक इशारा दिला.
यापूर्वी मी ॲनाकोंडा हा शब्द वापरला होता. त्याचा अनुभव महायुतीमधील त्यांच्या मित्र पक्षांना यायला लागल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना गिळल्याशिवाय हा ॲनाकोंडा थांबणार नाही असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. महायुती चा एकसंघपणा म्हणजे गरज सरो वैद्य मरो असे असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. यामुद्दावर या सरकारला डिकोड करायला हवे, असे ते म्हणाले.















Discussion about this post