मुंबई । मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चाला राज्यातून अनेक ठिकाणीहून लोक आले. हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि इतर काही नेते उपस्थित आहेत. या मोर्चाचं नेतृत्वही ठाकरे बंधूंनीच केलं. विशेष बाब म्हणजे या मोर्चात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसह युती करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. तसेच भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसह एकत्र का आलो आहे? ते सांगितलं.
आम्ही दोघे एकत्र आलो..
उद्धव ठाकरे सभेत म्हणाले की, मी आणि राज दोघंही भाऊ एकत्र आलो आहोत. पण आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसांसाठी. हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे. साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळवून दाखवा. हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच या सभेत त्यांनी निवडणूक आयोगा विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचे देखील म्हटले. चोर दिसेल त्याला तिथेच फटकवा. लोकशाही मार्गाने फटकवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. अॅनाकोंडा बसला आहे. मी मागेही आवाहन केल होतं. निवडणूक येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबत आहोत. येत्या काही दिवसात आपण न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळतो की नाही पाहू. आम्हाला आता न्याय पाहिजे. सर्व पुरावे दिल्यानंतर. त्या न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री आहे. नाही तर जनतेचं न्यायालय निर्णय घ्यायला तयार आहे. असे ते म्हणाले.















Discussion about this post