मुंबई । शिंदे सेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहसंदर्भात मोठा खळबळजनक आरोप केला आहे. दोन दिवस बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, तसेच त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेण्यात आले, असा आरोप रामदास कदम यांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.या आरोपांवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. त्यांना उत्तर देण्याची गरजही नाही. ठाकरे म्हणजे काय आहे? हे आख्खा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोरांना मी उत्तर देणार नाही.” यावेळी उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांचा उल्लेख गद्दार आणि नमकहराम असा केला आहे.
दरम्यान, या प्रकारचे आरोप झाल्यावर त्रास होतो का? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “हो, मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात. पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं माझं भाषण थांबवू का विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात तेव्हा त्या या वेदनांवर रामबाण उपाय झाला आहे असं मला वाटतं. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठिशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकलो आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.















Discussion about this post