मुंबई । आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे
शिल्पा बोखडे या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या होत्या, त्यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू उत्तमरित्या मांडली होती. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हा पक्षासाठी मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.
“माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र! माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे,”
“मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा,” असा घणाघाती आरोप शिल्पा बोडके यांनी केला आहे.
Discussion about this post