मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) त्यांना संपवण्याचे आव्हान दिले असून त्यांना त्यांचे वडील दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि जनतेचा आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे.
पक्षाचे मुखपत्र ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी स्वीकारण्यास भाजप तयार नसताना राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय कसे घेऊ शकते, असा सवाल केला. तसेच सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा मुद्दा सोडवला आहे. भाजपवर निशाणा साधत ठाकरे म्हणाले, मला संपवायचे असेल तर करा. मला माझ्या वडिलांचे आणि लोकांचे आशीर्वाद आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाष्य केलं. अजित पवार यांनी शरद पवार यांना वयामुळे निवृत्त व्हावे असं म्हटलं होते . अशी विधाने महाराष्ट्राच्या परंपरेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.त्यांचे वडील आणि शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाचवल्याचा दावाही त्यांनी केला आणि या उपकाराची परतफेड अशा प्रकारे झाली का, असा सवालही त्यांनी केला.
Discussion about this post