मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. यातच या प्रकरणावरून शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केलीय.
फडणवीस हे जे बोलले, त्यांनी श्वान शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरला म्हणून ते सुसंस्कृत होत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी फडतूस, कलंक बोललो पण आता काही शब्द नाहीत, मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वत: दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
सरकार हे पोलिसांच्या मागे ठामपणे उभं राहण्याऐवजी गुंडांच्या मागे उभं रहात असेल तर कठीण आहे. राज्यात गुंडगिरी वाढणार. पूर्वी एक जाहिरात होती मेलेडी खाओ सब जान जाओ. आता अशी परिस्थिती आहे ती ‘भाजपमे आओ सब भूल जाओ’ ही मोदी गॅरेंटी आहे. सरकार गुंडांच्या मागे उभं राहिलं तर अशीच गुंडगिरी राहील. यापुढच्या पिढ्या, आपलं भवितव्य गुंडांच्या हाती देणार आहात का असा जनेतला प्रश्न जनतेला विचारायचा आहे. आम्ही राज्यपालांकडे जाणारच नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की हे सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.