नाशिक । अयोध्येत रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केली. गोविंदगिरी महाराज या वक्तव्याचा आता उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. कदापि नाही, त्रिवार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काल कोणीतरी म्हणाले छत्रपती म्हणजे आपले पंतप्रधान..पण पंतप्रधानांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच तुलना होऊ शकत नाही, छत्रपती होते म्हणून आज राम मंदिर उभे झाले, असे कानही त्यांनी टोचले.
‘आज रामायणातील बारकावे संजय राऊत यांनी सांगितले. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते. राऊतांनी सामनाचे श्लोक सांगितले. सामना कसा करावा याचे श्लोक सांगितले. संयम , एक वचनी आणि एक पत्नी ते खरच आहे. माझा उल्लेख केला. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आज रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत.’ असा इशारा पण त्यांनी दिला.
Discussion about this post