नागपूर । जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी नागपुरातील यशवंत मैदानात सुरु आंदोलन केलं. या आंदोलनात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी भेट दिली.यावेळी उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं.यावेळी त्यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहे.
आताचे राज्यातील सरकार हे केंद्राप्रमाणे केवळ आश्वासनाच्या रेवड्या देणारं सरकार आहे. “आमचं सरकार पेंशन योजनेबद्दल निर्णय घेणार होतं, तेवढ्यात आमचं सरकार पडलं. माझं सरकार पडलं नसतं तर तुम्हाला आज मोर्चा काढावा लागला नसता. मी जर मुख्यमंत्री असतो तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करावं लागलं नसतं. पाच दिवसांचा आठवडा हा निर्णय मी घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांचं योगदान मला माहिती आहे.
या सरकारला त्याचं काही देणंघेणं नाही. त्यामुळे या सरकारला आता पेन्शन नव्हे टेन्शन देण्याची गरज आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील यशवंत मैदानात सुरु असलेल्या जुन्या पेन्शन आंदोलनाला भेट दिली. निवडणूक येत आहे, पुन्हा तुम्हाला फसवलं जाईल, जसं 2014 मध्ये फसवलं होतं, 15 लाख आले का? अच्छे दिन आले का?” माझी शिवसेना आणि माझे शिवसैनिक तुमच्यासोबत आहे. आज स्वागत करू नका, जेव्हा आपलं सरकार येईल आणि जुनी पेंशन लागू होईल, तेव्हा स्वागत करू लढाई थांबवू नका. कोणाच्या फसव्या घोषणेला बळी पडू नका.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Discussion about this post