बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावं. युको बँकेतील भरती वेगवेगळ्या राज्यांसाठी करण्यात आली आहे.
या भरतीद्वारे एकूण २५० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. महाराष्ट्रात ७० जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार आपापल्या राज्यात अर्ज करु शकतात. त्यामुळे ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
युको बँकेत अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवीधर असणे गरजेचे आहे. २० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ()
या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, अर्थव्यवस्था, इंग्रजी याबाबतचे प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाणार आहे. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.















Discussion about this post