जळगाव | जळगाव शहर पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन मुलांना चोरीच्या ६ दुचाकीसह अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी आज शनिवारी दिली. जळगावात नागरिकांच्या दुचाकींची चोरी झाल्याचे प्रकार वाढत असून याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, अमोल ठाकूर यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी मध्यरात्री एसएम आयटी कॉलेज परिसरात सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या दोघांकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहे. दरम्यान यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी शनिवार १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता दिली आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.