जळगाव । अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अनुदानात मुक्ताईनगर तालुक्यातील गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोन तलाठी, प्रत्येकी एक कोतवालासह महसूल सहायकाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी निलंबित केले आहे. या कारवाई सोबतच चौघांवर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसे पुरावेही त्यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी घुगे यांनी एका समितीकरवी चौकशी केली.
निलंबित केलेल्यांची नावे?
मुक्ताईनगर तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठी महेंद्र वंजारी, उचंद्याचे कृष्णकुमार ठाकूर (हल्ली पारोळा येथे सेवारत), तहसीलदार कार्यालयातील महसुल सहायक मनिष बेंडाळे व उंचद्याचे कोतवाल राहुल सोनवणे यांचा समावेश आहे.















Discussion about this post