जळगाव। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी मार्च २०२३ मध्ये झालेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले आहे.
माध्यमशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थी सूर्यकांत देशमुख आणि रोहित देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी जनसंवाद आणि पत्रकारिता या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आतापर्यंत माध्यमशास्त्र प्रशाळेतील सात विद्यार्थ्यांनी सेट व नेट या परीक्षेत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी कौतुक केले आहे. माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले आहे.
Discussion about this post