पालघर । पालघरच्या वाडा तालुक्यामधील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. दोन विद्यार्थ्यांनी झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं. देविदास परशुराम नावळे (इयत्ता १० वी रा. बिवळपाडा ता . मोखाडा) आणि मनोज सीताराम वड (इयात्ता – ९ वी रा. दापटी ता. मोडाखा) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागचे कारण समोर आले नाह. मात्र या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते गावातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार यांच्या कार्य क्षेत्रात येणारी आदिवासी वस्तीगृह आणि वास्तीशाळेत ही घटना घडली. या ठिकाणी देविदास परशुराम नावळे आणि मनोज सीताराम वड हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या आदिवासी वस्तीगृहात होते. त्यांनी शाळेच्या आवारातील झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं.
आज सकाळी देविदास आणि मनोज या दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत वस्तीशाळेत आढळून आले. या घटनेमुळे शाळेमध्ये एकच खळबळ उडाली. दोघांचे मृतदेह पाहून इतर विद्यार्थि प्रचंड घाबरले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.















Discussion about this post