चाळीसगाव । चाळीसगाव भडगाव रोडवरील बडाळा वडाळी फाटयाजवळ पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, सहा काडतूस जप्त करण्यात आले. शिवम कैलास जगताप (वय १९ रा. जुनी पीवर हाऊस रोड भिम नगर चाळीसगाव) व अभिजीत रतन चव्हाण (वय १९ रा. जुना पॉवर हाऊस रोड भिम नगर चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
चाळीसगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना दोघेजण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोना राहुल पाटील यांना सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवम जगताप याला चाळीसगाव भडगाव रोडवरील माऊली हॉटेल जवळ अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तूल, मॅक्झीन व चार जिवंत काडतुस असा एकुण ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच चाळीसगाव भडगाव रोडवरील अंबिका हॉटेल जवळ अभिजीत चव्हाण या संशयित आरोपीला गावठी पिस्तूल, मॅक्झीनसह दोन काडतुसे असा ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दोघांवर चाळीसगाव शहर व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ३ दिवस पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. संशयित आरोपी अभिजीत चव्हाण याने हे पिस्तूल समाधान बळीराम निकम (रा.पाचोरा) याच्याकडून विकत त्याला ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.















Discussion about this post