जळगाव । एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वन विभागातील महिला कर्मचारी वैशाली गायकवाड, दुसरा कर्मचारी आणि श्रीकृष्ण वखारमालक सुनील धोबी, अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, यापैकी गायकवाड व धोबी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने लाचखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, तक्रारदार यांचा भाऊ यांनी शेतातील निबांचे झाडे तोडुन मालेगांव येथे नेण्यासाठी ट्रक मध्ये भरुन घेवुन जात असतांना सावित्री फटाके फॅक्टरी समोर वन विभागाचे वनपाल वैशाली गायकवाड, एक वनविभागाचा कर्मचारी व सुनिल धोबी सॉ मिल वाले अश्यांनी पकडला होता. सदरचा ट्रक बेकायदेशीर लाकुड वाहतुक केल्याचे कारण सांगून वैशाली गायकवाड यांनी पकडला आणि सदर ट्रक हा श्रीकृष्ण सॉ मिल पारोळा येथे लावून दिला होता.
त्यानंतर तक्रारदार व तक्रारदार यांचा भाऊ असे वेळोवेळी वैशाली वनपाल गायकवाड व एक वन विभागाचे कर्मचारी अश्यांना भेटुन गाडी सोडण्याची विनंती केली असता वनपाल गायकवाड यांनी नमुद गाडी सोडण्याचे मोबदल्यात सुरवातीला 2,50,000/- रुपये ची मागणी केली, व त्यानंतर तडजोडीअंती वनपाल वैशाली गायकवाड व वनविभागाचा एक कर्मचारी यांनी 1,00,000/- रुपये खाजगी इसम सुनिल धोबी यांच्याकडे देण्यास सांगितले होते.
याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. सदर तक्रारीवरून पंच साक्षीदारांसमक्ष पडताळणी दरम्यान खाजगी सुनिल धोबी व वनपाल वैशाली गायकवाड व एक वनविभागाचा कर्मचारी यांनी श्रीकृष्णा सॉ मिल, पारोळा येथे तक्रारदार यांचा भाऊ यांचेकडुन शेतातील निबांचे झाडे तोडुन भरलेला ट्रक ही बेकायदेशीर लाकुड वाहतुक केल्यामुळे पकडल्याचे कारण सांगुन सदर वाहना विरुध्द कोणतीही कायदेशिर कारवाई न करण्यााच्या मोबदल्यात लाच म्हणुन 1,00,000/- रुपये (अक्षरी एक लाख रुपये) लाचेची रक्कम पंच साक्षीदारांसमक्ष मागणी केल्याचे निषन्न झाले म्हणुन पारोळा पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7(अ), 12 प्रमाणे दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.















Discussion about this post