एरंडोल | राज्यासह जळगाव जिल्ह्यात सुरु असलेले अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच राष्ट्रीय महामार्गवरून जाणारी खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे घडली.
पिंपळ कोठा गावाजवळ हा अपघात झाला. श्री चौधरी ट्रॅव्हल्स (बस क्रमांक :एआर ०१ वाय ०००९) ही खासगी बस मुंबई-नागपूर महामार्गावर दुभाजकाला आदळून पलटी झाली. यात दोन जणांचा मृत्यू झाला. यात चालकाचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत
झाल्याने १२ प्रवासी जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी ८:३० वाजता घडली. दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत. दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार (वय ३०), रतनलाल कुमावत (वय ४०), जयराम कुमार (वय ३२), महादेव कुमार (वय ४५), अनोळखी (वय ३०), अनोळखी हे गंभीर झाले आहेत तर राजेंद्र प्रजापती (वय ४५), सीताराम कुमार (वय ३५), मुकेश गुजर, लक्ष्मी जांगीड (वय ५०) हे किरकोळ जखमी आहेत. तर मृत चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संततधार पावसाने चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.















Discussion about this post