चोपडा । चोपड्यातुन एक धक्कादायक घटना समोर आलीय. नदीच्या काठालगत खेळत असताना पाण्यात उतरलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील दोंदवाडे गावालगत घडली. मृतांमध्ये एक सहावर्षीय मुलगी व एक सातवर्षीय मुलाचा समावेश आहे.
चोपडा तालुक्यातील दोंदवाडे येथील मनीषा परशुराम कोटे (वय ६) व बाजीगर गाठीराम पावरा (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दोन्ही बालकांचे वडील हे दोंदवाडे गावात सालदारकीचे काम करतात.गावाच्या लागतच तापी नदी असून ही दोन्ही मुले दुपारी नदीच्या काठाजवळच खेळत होती. दरम्यान सायंकाळी ही दोन्ही बालके दिसत नसल्याने गावात शोधाशोध सुरू झाली. मात्र ते गावात कुठेही आढळून आली नाहीत.
यानंतर ग्रामस्थांनी तापी नदीकडे धाव घेतली. चार, पाच दिवसांपूर्वी गूळ मध्यम प्रकल्पातून तापी नदीत पाणी सोडले गेल्याने नदीला पाणी होते. या पाण्यात दोन्ही बालके सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुडालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळून आले. गावातील नागरिकांनी दोन्ही बालकांना तापी नदीतून काढत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post