धुळे : धुळ्यातून लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधकात्मक कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी केली. दीड लाखाची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे धुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.
धुळे स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी लाच प्रकरणात अडकले आहेत. प्रतिबंधकात्मक कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारांकडून दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात केली होती. या नंतर तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान हि लाचेची रक्कम स्वीकारताना या दोघा स्थानीकी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दोंडाईचा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे सुरू आहे.
Discussion about this post