छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे चार मुले गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. यावेळी दोन बाल वारकऱ्यांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यात दोघांना वाचविण्यात यश मिळाले. बुडालेल्या मुलांचा शोध घेणे सुरु आहे. दरम्यान घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था आहे. याठिकाणी मुलांना लहानपणापासून शिक्षणासाठी अनेक पालक टाकत असतात. वारकरी संप्रदायिक शिक्षण देण्यासोबत दहावी- बारावी पर्यंतचे शिक्षणाचे धडे देखील दिले जात असतात. त्यानुसार येथे अनेक बालक दाखल आहेत. दरम्यान काही बालक आज सकाळच्या सुमारास जवळच असलेल्या गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेले होते.
पैठण शहरातील रंगारहाटीत विष्णू महाराज गायकवाड यांच्या वारकरी संस्थेत इतर मुलांसोबत चैतन्य बदर हा इयत्ता आठवीत, तर भोलेनाथ पवळे हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता. हे दोघे जण आपले मित्र अर्जुन राजुरकर आणि करण तुपे यांच्यासोबत गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेले. हे चौघे पाण्यात उतरले. मात्र गोदावरी नदी पात्रातील पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. ज्याठिकाणी हे चारही मुले अंघोळीसाठी उतरले त्याठिकाणी खड्डा असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. यामुळे चौघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. आजूबाजूच्या वारकऱ्यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेतल्याने यातील दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, चैतन्य अंकुश बदर आणि भोलेनाथ कैलास पवळे या दोन्ही बाल वारकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह शोधण्याचा काम सुरु आहे.
Discussion about this post