Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

कंडारीतील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
कंडारीतील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना अटक
बातमी शेअर करा..!

जळगाव । भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात जळगावच्या जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) या तरुणाचा खून झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी ११ वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनेच्या अवघ्या काही तासात संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कोळी (वय ४०) हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका वैयक्तिक कामानिमित्त गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना त्यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद काही क्षणांतच चकमकीत परिवर्तित झाला आणि तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. पोलिसांच्या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

या संशयित आरोपी राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव) मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) या दोन्ही संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.

दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या पथकाने तपासाच्या दिशेने निर्णायक हालचाल करत दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी, ता. भुसावळ) या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं. या कारवाईत भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमागील नेमकं कारण आणि इतर कोणतेही सहकारी असल्यास त्यांचा शोध सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर ; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना खंडपीठाने ठोठावला इतक्या लाखांचा दंड?

Next Post

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page